पुणे: महायुतीचे 237 आमदार आहेत. 51 टक्के मते घेऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत. राज्यातील 14 कोटी जनतेची देवेंद्र फडणवीस सरकारला मान्यता आहे. तीनही पक्षांचे काम व्यवस्थित सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात संवाद आहे.
त्यांनी दररोज एकमेकांबरोबर बोललेच पाहिजेत असा आग्रह कशासाठी? न बोलताही ते काम करत आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना एकटे पाडण्याचा हा प्रकार आहे का? या प्रश्नांला काहीही अर्थ नसल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. (Latest Pune News)
पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी (दि.2) रोजी पुणे दौर्यावर होते. कसबा गणपतीबरोबरच शहरातील मानाच्या पाचही गणपतींचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते माध्यमाशी बोलते होते.
बावनकुळे म्हणाले की, ‘मराठा समाजाला आरक्षण देताना एकाच्या ताटातील काढून ते दुसर्याच्या ताटात देण्यास राज्य सरकारला अजिबात रस नाही. तर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचा आमचा प्रयत्न आहे’