[author title="हेमांगी सूर्यवंशी" image="http://"][/author]
पिंपरी : सध्या उन्हाळी सुट्या असल्याने अनेकजण आपल्या गावी जातात. साहजिकच नागरिकांकडून प्रवासासाठी एस.टी. अथवा रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिले जाते. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या पुणे विभागाकडून राजस्थान, बिहार, आणि उत्तर प्रदेश, दिल्लीसह इतर राज्यांत विशेष गाड्या सोडल्या आहेत. मात्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महारष्ट्रात जाणार्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या नसल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करावा लागत आहे; मात्र ट्रॅव्हल्सकडून नेहमीपेक्षा जादा भाडे आकारले जात आहे. या प्रकाराकडे आरटीओचे दुर्लक्ष होत असून, ऐन सुटीच्या काळात आपल्या गावी जाणार्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे.
रेल्वेचा प्रवास स्वस्त, जलद अन् सर्वसामान्यांना परवडत असल्याने नागरिकांची रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी होते. सुटीमुळे अनेकजण गावी
जाण्यास तसेच देव दर्शनासाठी, पर्यटनस्थळी जाण्यासाठी नागरिक पसंती देतात. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे रेल्वेगाड्या हाऊसफूल धावत असून, गाड्यांचे आरक्षण फूल आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुणे विभागाकडून झांसी, अजमेर, गोरखपूर, हजरत निजामुद्दीन या विशेष रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. पण, राज्यातील इतर भागांत जाण्यासाठी गाड्या मिळत नसल्याने प्रवाशांना
खासगी ट्रॅव्हल्सचा नागरिकांना आधार घ्यावा लागत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
उन्हाळी हंगाम, शाळा, कॉलेजला सुटी जाहीर झाल्याने प्रवाशांची रेल्वे गाड्यांना गर्दी होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून 488 विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन रेल्वेने केले असून, पुणे विभागाकडून 120 गाड्यांपेक्षा अधिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.
विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात उन्हाळी सुटीत धार्मिक, पर्यटनासाठी जाणार्या प्रवाशांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार नाहीत. त्यामुळे या भागातील प्रवाशांना अन्य राज्यात जाणार्या प्रवाशांसह दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे काही प्रवाशांकडून खासगी ट्रव्हल्सला पसंती दिली जात आहे. मात्र, खासगी ट्रव्हल्स चालकांकडून बुकिंग फूल असल्याचे सांगून जास्त पैसे आकारले जात आहेत.
विदर्भातील महत्त्वाची शहरे : नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, बुलडाणा, वाशिम, अकोला
हेही वाचा