पुणे

पिंपरी: विसर्जन घाटांवर अपुरे मनुष्यबळ, जनसंवाद सभेत नागरिकांच्या तक्रारी

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: शहरातील गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेने उपलब्ध करून दिलेले मनुष्यबळ अपुरे आहे. ते मनुष्यबळ वाढवावे, अशी तक्रार जनसंवाद सभेत नागरिकांनी केली. सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी गणेश विसर्जनस्थळी वैयक्तिक लक्ष देऊन कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिले आहेत.

सभेचे अध्यक्षपद अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता सतीश इंगळे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले.
या वेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात व विविध विभागाचे अधिकारी
उपस्थित होते.

तक्रारींचा पाढा…

रस्त्यावर आणि इतरत्र गाड्या उभ्या केल्याने रहदारीस होतोय अडथळा.
रस्त्यांपेक्षा पदपथ मोठे झाल्याने वाहतूक कोंडी.
नो पार्किंगचे फलक लावून वाहतूक पोलिसांकडून नियमितपणे कारवाई करा.
पदपथांवरील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा.
रस्त्याकडेच्या धोकादायक वृक्षांची छाटणी करा.
तुंबलेल्या ड्रेनेज वाहिन्या दुरुस्त करा.
घंटागाड्यांमधून कचरा वाहताना तो रस्त्यावर पडणार नाही, याची दक्षता घ्या.
पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करण्यात यावा.
उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT