पुणे

निरा देवघर धरण पुन्हा शंभर टक्के

अमृता चौगुले

भोर : पुढारी वृत्तसेवा : निरा देवघर धरण पूर्ण क्षमतेने पुन्हा 100 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने निरा नदीपात्रात धरणाच्या सांडव्याद्वारे 1744 क्यूसेक व विद्युतगृहाद्वारे 750 क्यूसेक असे एकूण 2494 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाटघर धरणात 96 टक्के पाणीसाठा झाला आहे. निरा पाटबंधारे उपविभाग सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी ही माहिती दिली. निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपासून पाऊस पडत असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणातून नदीपात्रामध्ये रविवारी सकाळी 7 वाजता एकूण 4230 क्यूसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला.

सायंकाळी विसर्ग 2494 क्यूसेक करण्यात आला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. धरण 19 ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते. तेव्हापासून धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून नदीपात्रामध्ये 750 क्युसेक, तर पावसाच्या तीव—तेनुसार कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू होता. परंतु, धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातून होणारा विसर्ग 2 सप्टेंबरपासून बंद करण्यात आला होता. भाटघर धरणात 96 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी 14 ऑगस्ट रोजी धरण 100 टक्के भरले होते. यंदा धरण पूर्ण क्षमतेने
भरलेले नाही.

SCROLL FOR NEXT