इंदापूर: ग्रामीण भागात सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अघोषित भारनियमन महावितरणने लादले आहे. त्या विरोधात इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात गावकऱ्यांनी महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. १) गाव बंदचे आवाहन केले होते. त्याला १०० टक्के प्रतिसाद लाभला.
अघोषित भारनियमन रद्द करण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत येत्या सोमवारी बारामतीत ऊर्जा भवन येथे महावितरण विभागीय कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित केली असून त्या ठिकाणी तोडगा निघेल, असे आश्वासित महावितरणच्या वतीने करण्यात आल्यानंतर आजचा हा गावातील बंद मागे घेण्यात आला.