उदय पोवार
येरवडा : पुणे महानगरपालिकेने शहरात बेघर लोकांसाठी रात्रीचा निवारा मिळावा, यासाठी चार मोफत रात्र निवारा प्रकल्प सुरू केले आहेत. पुण्यात ज्यांना वास्तव्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नाही, त्यांना हे प्रकल्प आधार ठरत आहेत. येरवडा येथे मजॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्टफमार्फत चालविण्यात येत असलेल्या निवारा प्रकल्पात रोज पंधरा ते वीस नागरिक वास्तव्यास असतात.
सर्वोच्च न्यायालयाने शहरी भागात बेघर, निराश्रित लोकांसाठी रात्र निवारा प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 66 मधील तरतुदीनुसार पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात चार रात्र निवारा प्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पाचा लाभ रस्त्यावरील, फुटपाथवर झोपणारे, बाहेर गावावरून आलेल्या गरजू प्रवाशांना
पुणे महापालिकेमार्फत मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
पुण्यातील राहण्याची सोय झाली
येरवडा येथील मदर तेरेसा समाजमंदिरात राहणारा युवक अतुल इंगवले म्हणाला, ममी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील आहे. चार दिवसांपूर्वी नोकरीनिमित्त पुण्यात आलो. मात्र, राहण्यास जागा नव्हती. मी गुगलवर सर्च केल्यानंतर मला येरवडा येथील रात्र निवारा प्रकल्पाचा पत्ता मिळाला. येथे राहून मी कामाचा शोध घेत होतो. आता मला काम देखील मिळाले आहे.
एका व्यक्तीला मिळतो 15 दिवसाचा निवारा
जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे जॉर्ज स्वामी म्हणाले की, येरवडा येथील निवारा प्रकल्पात 30 बेड उपलब्ध आहेत. ज्याला राहावयाचे आहे त्याच्याकडेे आधार कार्ड आवश्यक आहे. एक व्यक्ती पंधरा दिवस सेंटरमध्ये राहू शकते. रात्र निवारा प्रकल्पासाठी नागर वस्तीच्या उपायुक्त रंजना गगे, रामदास चव्हाण, अशोक पाटील, संदीप कांबळे, जॉन पॉल, डॅनियल लांडगे यांसह
सेंटरमधील कर्मचार्यांचे सहकार्य मिळत असल्याचे जॉर्ज स्वामी
यांनी सांगितले.
येथे आहेत रात्र निवारा केंद्रे
सेनादल पोलिस चौकीमागे, नवी पेठ,
मोलेदिना हॉल, पार्किंग प्लाझा, पीएमटी वाहनतळ इमारत, पुणे स्टेशन
मदर तेरेसा समाजमंदिर गाडीतळ, येरवडा
दूधभट्टी समाजमंदिर, रेल्वे
फाटकाशेजारी, बोपोडी
मी मिळेल ते बिगारी काम करतो. बाहेर फुटपाथवर, बसस्टँडवर झोपत होतो.मात्र, निवारा प्रकल्पात आल्यापासून संरक्षण मिळत असून, येथे आपले घर मिळाल्याचे फीलिंग येते.
– जालिंदर पवार,ज्येष्ठ नागरिक