बाणेर परिसरात साडेपाच लाखांचे अमली पदार्थ जप्त File Photo
पुणे

बाणेर परिसरात साडेपाच लाखांचे अमली पदार्थ जप्त

बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बाणेर परिसरात ओझोकुश (हायड्रोफोनिक गांजा) या अमली पदार्थाची तस्करी करणार्‍याला अमली पदार्थविरोधी पथक-2 ने अटक केली. अर्जुन लिंगराज टोटिगर (वय 26, रा. सुखवानी पॅनरोमा, सूसगाव, बाणेर) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून तीन लाख पाच हजारांचा 30 ग्रॅम 540 मिलिग्रॅम ओझोकुश गांजा (हायड्रोफोनिक गांजा) व इतर ऐवज मिळून साडेपाच लाखांचा ऐवज जप्त केला.

त्याच्याविरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अटक आरोपी हा मार्केटिंग आणि सेल्सचा पदवीधर असून, सध्या तो खासगी कंपनीमध्ये काम करत आहे. अमली पदार्थविरोधी पथक-2 हे 10 एप्रिलला बाणेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

त्या वेळी पोलिस अंमलदार आझाद पाटील यांना बाणेर येथील शिवशक्ती चौकात एक जण गांजा तस्करी करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून तीन लाख पाच हजारांचा गांजा जप्त केला. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, प्रशांत बोमादंड्डी, दिनेश बास्टेवाड यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT