पुण्‍यातील बॉटनी (वनस्‍पतीशास्‍त्र) प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्लीच्या विशेष सीबीआय (CBI) न्यायालयाने १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. Pudhari
पुणे

NEET UG 2026 paper leak | नीट पेपरफुटी प्रकरणी बॉटनीच्या वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी

बॉटनी आणि झूलॉजीचे अनेक प्रश्न आधीच उघड केल्‍याचा मांढरेवर आरोप

पुढारी वृत्तसेवा

NEET UG 2026 paper leak

नवी दिल्ली : NEET-UG 2026 पेपर फूटीप्रकरणी पुण्‍यातील बॉटनीच्‍या (वनस्‍पतीशास्‍त्र) प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शनिवारी (दि. १६) अटक केली होती. तिला आज (दि. १७) दिल्लीच्या विशेष सीबीआय (CBI) कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

मांढरेचे मुख्‍य सूत्रधारांशी थेट कनेक्‍शन

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने या पेपर फुटीच्या कटाचा सखोल तपास करत आहे. मनीषा मांढरे या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांशी तिचे थेट कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे. मनीषा मांढरे NEET-UG 2026 च्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी होती. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) तिची 'तज्ज्ञ' म्हणून नियुक्ती केली होती. यामुळे तिला बॉटनी (वनस्‍पतीशास्‍त्र) आणि झूलॉजी (प्राणिशास्त्र) च्या प्रश्नपत्रिका पाहण्याची परवानगी मिळाली होती.

बॉटनी आणि झूलॉजीचे अनेक प्रश्न आधीच उघड केल्‍याचा आरोप

सीबीआयने स्‍पष्‍ट केले आहे की, एप्रिल २०२६ दरम्यान त्यांनी मनीषा मांढरे यांच्‍या माध्यमातून NEET परीक्षेला बसणाऱ्या संभाव्य विद्यार्थ्यांशी संपर्क साधला होता. त्‍यांनी त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग क्लासेस घेतले होते. या क्लासेसदरम्यान त्यांनी बॉटनी (वनस्‍पतीशास्‍त्र) आणि झूलॉजी (प्राणीशास्‍त्र)चे अनेक प्रश्न आधीच उघड केले. हे प्रश्‍न विद्यार्थ्यांना त्यांच्या वह्यांमध्ये व पाठ्यपुस्तकात नोंदवून घेण्यास सांगितले होते. त्यांनी दिलेले बहुतांश प्रश्न ३ मे रोजी घेतलेल्या (आणि आता रद्द झालेल्या) मुख्य NEET-UG 2026 च्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळणारे होते.

पुढील १४ दिवस कसून चौकशी होणार

सीबीआयने आरोपीच्या कोठडीची मागणी करताना न्‍यायालयास सांगितले की, नीट पेपर फुटीच्या मागे खूप मोठे रॅकेट असून, अनेक बड्या नावांचा यात समावेश असण्याची शक्यता आहे. न्यायालयाने सीबीआयचा हा युक्तिवाद मान्य करत मनीषाला १४ दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली आहे.

सीबीआयचे देशभरात सहा ठिकाणी छापे

नीट पेपरफुटीप्रकरणी गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरात सहा ठिकाणी छापे टाकले असून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त केलेल्या साहित्याचे सविस्तर विश्लेषण सुरू असल्याचे सीबीआयने स्‍पष्‍ट केले आहे. आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाच आरोपींना आधीच चौकशीसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, पुण्यात अटक करण्यात आलेल्या इतर दोन आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, त्यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला हलवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT