रुग्णालयांत उपचार मोफत द्यावेत: नीलम गोर्‍हे file photo
पुणे

रुग्णालयांत उपचार मोफत द्यावेत: नीलम गोर्‍हे

'पुणेकरांनी पाणी गरम करून प्यावे'

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका रुग्णालयांत सर्व उपचार मोफत द्यावेत. रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना बाहेरून औषधे आणायला लावू नये, अशा सूचना बैठकीत केल्या आहेत, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी दिली.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी पाणी गरम करून प्यावे तसेच नागरिकांनी आपल्या परिसरात ड्रेनेजलाइनमधून पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी जात असेल तर याबाबत खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला कळवावे.

असर अहवालाच्या पार्श्वभूमीवर मी बैठकीत मुद्दा मांडला. यावर बैठकीत काही सदस्यांनी पाठिंबा दिला. आम्ही आदर्श शाळा बनवत आहे. त्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली, त्याला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. लवकरच याबाबतची बैठक होईल. जनतेने चांगला जनादेश दिल्यामुळे या बैठकीची वाट पाहत होतो. बैठकीत आदिवासी, सामाजिक न्याय यासह अनेक विषयांवर चर्चा झाली.

शैक्षणिक दर्जा खालावल्याप्रकरणी असरच्या अहवालावर चर्चा केली. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढविण्याच्या विषयावर स्वतंत्र बैठक घेणार आहे. जीबीएसबाबत महानगरपालिकेच्या दवाखान्यात बाहेरची औषधे लिहून दिली जात आहेत.

महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सर्व औषधे मिळायलाच हवीत. खासगी हॉस्पिटलमध्ये आर्थिक पिळवणूक झाली नाही पाहिजे. नियोजन समितीकडे निधी आहे, त्याची कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT