पुणे

दौंड खरेदी-विक्रीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; 17 पैकी 14 जागा बिनविरोध

अमृता चौगुले

दौंड; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 14 जागा बिनविरोध झाल्या असून, तीन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे : कासुर्डी गटातून सदानंद वामन दोरगे, खामगाव गटातून विजय पंढरीनाथ नागवडे, केडगाव गटातून ज्ञानदेव साहेबराव शेळके, पारगाव गटातून नानासाहेब गुलाबराव जेधे, नानगाव गटातून विश्वास राजाराम भोसले

दौंड गटातून जयवंत रामचंद्र गिरमकर, रावणगाव गटातून गजानन नारायण गुणवरे, वैयक्तिक प्रतिनिधीमधून प्रेमनाथ बबनराव दिवेकर, पुरुषोत्तम बाळासाहेब हंबीर, महिला प्रतिनिधीमधून सविता आप्पासो ताडगे, नंदा दत्तात्रेय ताकवले, अनुसूचित जाती-जमातीमधून विकास अनिल कांबळे, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून संपत मारुती शेलार, भटक्या विमुक्त जातीमधून अश्रू सोमा डुबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिंपळगाव गटामधून मोहन रामचंद्र टुले विरुद्ध नारायण रामचंद्र जगताप, पाटस गटातून शिवाजी संपत ढमाले विरुद्ध रंजना बबन भागवत तसेच वरवंड गटातून लक्ष्मण पांडुरंग दिवेकर, संजय खंडू धायगुडे आणि सचिन गोरख सातपुते यांच्यात लढत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT