पुणे: अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग््रेास आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग््रेास यांनी बंडखोरांची तसेच आगाऊ एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची समजूत काढण्यासाठी दिवसभर कसून प्रयत्न केले. त्याला बऱ्याच अंशी यश आले असले तरीही किमान 7 ठिकाणच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यात अपयश आले. तेथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
अंतिमत: राष्ट्रवादी काँग््रेासकडून 130 पेक्षा जास्त आणि शरद पवार गटाकडून 43 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास 125 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष 40 जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे सूत्र निश्चित झाले होते. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही पक्षांनी दिलेल्या एबी फॉर्मची बेरीज 165 पेक्षा किती तरी अधिक होत होती. त्यामुळे उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, विशाल तांबे, मनाली भिलारे आदींनी गुरुवारपासून ‘ऑपरेशन माघारी’ सुरू केले होते. पहिल्या दिवशी अपेक्षित यश आले नाही. मात्र, शुक्रवारी त्यांनी थेट उमेदवारी अर्ज भरलेल्यांना काढण्यासाठी मोहीम सुरू केली. एक उमेदवार हडपसर परिसरात प्रचारात गुंतला असल्याचे समजताच हडपसरकडे मोर्चा वळवला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्याने माघार घेतली. अजित पवार पक्षातील पर्वतीमधील उमदेवार शिवाजी गदादे पाटील यांच्या विरोधात अर्ज भरलेल्याची समजूत काढण्यात या पथकाचा बराच वेळ गेला. अशा प्रकारे किमान 15 उमेदवारांची समजूत काढण्यात यश मिळाले. मात्र, किमान 7 ठिकाणी उमेदवारांनी हट्ट सोडला नाही. त्यामुळे तेथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने स्वत: व विशाल तांबे आणि मनीषा भिलारे यांनी अनेक ठिकाणी उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली. काही उमेदवारांची जिजाई बंगल्यावरच गाठ पडल्याने त्यांच्याशी ही समोरासमोर चर्चा करण्यात आली. काही जणांना भेटून, तर काहींना फोनद्वारे अशा जवळपास 15 हून अधिक उमेदवारांशी चर्चा करून अर्ज माघारी घेण्यात यश मिळवले आहे.अंकुश काकडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्ष
राष्ट्रवादी काँग््रेासकडून काही इच्छुकांनी उमदेवारी मिळाली नसल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी पक्षाच्या विनंतीला मान देऊन माघार घेतली आहे. हे सर्व जण पक्षसंघटनेत परतले असून, कामाला सुरुवात केली आहे.प्रदीप देशमुख, प्रवक्ते, राष्ट्रवादी