पुणे

बारामती बाजार समितीत राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने 18 जागांसाठी आपले 18 उमेदवार निश्चित करत यादी प्रसिद्ध केली. भाजपनेही या निवडणुकीत उडी घेत राष्ट्रवादीशी लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये 30 जणांचा समावेश आहे. शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून भाजप मित्रपक्षांसह निवडणुकीला सामोरे जात आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी उमेदवार यादी जाहीर केली.

त्यात राष्ट्रवादीच्या रयत पॅनेलमध्ये कृषी पतसंस्था सर्वसाधारण गटात सतीश सर्जेराव जगताप, रामचंद्र शामराव खलाटे, दयाराम सदाशिव महाडिक, बापूराव दौलतराव कोकरे, दत्तात्रय शंकरराव तावरे, विनायक महादेव गावडे, सुनील वसंतराव पवार, कृषी पतसंस्था महिला प्रतिनिधी गटातून प्रतिभा दिलीप परकाळे, शोभा विलास कदम, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून शुभम प्रताप ठोंबरे, इतर मागासवर्गीय गटातून नीलेश भगवान लडकत, ग्रामपंचायत गटातून विश्वास तानाजी आटोळे, विशाल ज्ञानदेव भोंडवे, अनुसूचित जाती-जमाती गटातून अरुण गणपत सकट, आर्थिक दुर्बल गटातून युवराज कैलास देवकाते, व्यापारी-आडते गटातून मिलिंद अशोक सालपे, संतोष पांडुरंग आटोळे तर हमाल व तोलारी गटातून नितीन शंकर सरक यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी भाजपकडून दाखल उमेदवारांबाबत माहिती दिली. भाजपकडून ग्रामपंचायत मतदारसंघात चंद्रकांत निवृत्ती खारतुडे, सुनंदा मेनिनाथ उदावंत, अजित मोहनराव तावरे, अभिजित सर्जेराव तावरे, पोपट गणपत खैरे, नीलेश सुरेश भापकर, आर्थिक दुर्बल घटकाकडून शुभांगी नेमाजी वायसे. भिवा ज्ञानदेव मलगुंडे, अनुसूचित जाती-जमाती गटातून गोविंद हेरबा गायकवाड, दयानंद बापूराव भोसले, महिला प्रतिनिधी गटातून अर्चना स्वप्निल गावडे, सीमा बाळासो सस्ते, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून दीपक आप्पासो आटोळे, चंद्रकांत खारतुडे, संकेत बाळासो गावडे, इतर मागास प्रवर्गातून पांडुरंग मारुती जाधव तर सर्वसाधारण गटातून विठ्ठल आबा देवकाते, धनंजय हनुमंत तावरे, दत्तू तुळशीराम खरात, नानासो विठ्ठल काळे, दीपक आप्पासो आटोळे, ऋषिकेश अशोक वाबळे, दयानंद चंद्रकांत कोकरे, विकास तुकाराम जगताप, अमित धनंजय काळखैरे, भिवा मलगुंडे, देवीदास गणपत बनकर यांचे अर्ज दाखल क?ण्यात आले आहेत. 20 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

SCROLL FOR NEXT