आळंदी : आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिरात नांदेड येथील भक्ताकडून एक कोटी रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. या सोन्याचे वजन एक किलो आहे.
भारत रामिनवार आणि मीरा रामिनवार यांनी हा सोन्याचा अलंकारिक मुकुट अर्पण केला आहे. चार महिन्यांच्या अथक परिश्रमातून हा मुकुट तयार केला असून, यामध्ये पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वारकरी परंपरेशी नाते असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभावाने घडवला. मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण इत्यादी मंगल प्रतीके आहेत. हा मुकुट मंगळवारी (दि. 17) माउलींना अर्पण करण्यात आला.