नानगाव: नानगाव (ता.दौंड )येथे आज दि.३० रोजी पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या पाठिमागील किचनचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटातून सोने,चांदी यांची जवळपास दोन ते अडीच तोळे घेऊन चोरटे लंपास झाले. (Latest Pune News)
येथील शेतकरी गौतम खराडे व उत्तम खराडे यांच्या घरी ही चोरी झाली असून पहाटे चोरीची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली व पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील पुर्व भागात देखील मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांचे सत्र सुरू आहे.