पुणे

तळेगाव ढमढेरेत पोलिसांकडून नाकाबंदी

अमृता चौगुले

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील वाढलेल्या चोर्‍यांसह बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. परिणामी, शिक्रापूर पोलिस ठाण्याने आपल्या हद्दीमध्ये नाकाबंदी करून 83 बेशिस्त वाहनांवर कारवाई करीत 83 हजार 700 दंड वसूल केला.

पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी कारवाईबाबत माहिती दिली. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, रणजित पठारे, हवालदार गणेश शेंडे, पोलिस नाईक अमोल नलगे, महिला पोलिस नाईक राणी भागवत, रूपाली निंभोरे, शिपाई अशोक केदार, ज्ञानदेव गोरे आदींनी तळेगाव ढमढेरे येथे नाकाबंदी केली. चारचाकी व दुचाकींची तपासणी करण्यात आली.

130 वाहनांची तपासणी

वाहनाला नंबर नसणे, दुचाकीवर तिघे बसून चालवणे, वाहन परवाना नसणे, कारला काळ्या काचा, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे आदी गुन्ह्यांमध्ये वाहनचालकांना दंड ठोठावला. तब्बल 130 वाहनांची तपासणी करीत 83 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल 83 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला. मागील अनेक दिवसांपासून शिक्रापूर परिसरात वाहनचोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे शिक्रापूर पोलिस ठाण्याने आपल्या हद्दीमध्ये नाकाबंदी करून कारवाई केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

SCROLL FOR NEXT