दौंड शहरातील नगर महामार्गावर असलेल्या रेल्वेपुलाचे गर्डर बदलावयाचे असल्याने सोमवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी दिवसभर या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, रेल्वे प्रशासन व दौंड पोलिसांनी दिली आहे.
दौंड-नगर महामार्गाचे नव्याने काम सुरु आहे. या महामार्गावर दौंड शहरालगत असलेल्या रेल्वेच्या पुलाचे गर्डर बदलण्यात येत आहे. त्यामुळे सोमवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे काम होणार आहे. या मार्गावरची वाहतूक पर्यायी नानविजमार्गे वळविण्यात येणार आहे, तरी वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.