muralidhar mohol  
पुणे

Maharashtra Olympic Association | महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड

स्वर्गीय अजित पवारांच्या निधनानंतर अध्यक्षपद होते रिक्त, पुणे येथे आयोजित असोसिएशनच्या विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (एमओए) च्या अध्यक्षपदी असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या असोसिएशनच्या विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात मोहोळ यांच्या निवडीमुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदावर अध्यक्ष नेमणे आणि इतर विषयासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये मोहोळ यांच्या नावाला सर्वानुमते सहमती मिळाली.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष असून या संघटनेच्या माध्यमातून ते महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली होती. स्वर्गीय अजित पवारांच्या निधनानंतर अध्यक्षपद गेल्या तीन महिन्यापासून रिक्त होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT