पुणे; पुढारी वृत्तसेवा : नातेवाईक असलेल्या महिलेवर तिरकी नजर असल्याच्या संशयातून घराशेजारी राहणार्या ज्येष्ठाचा खून करून फरार झालेल्या मूळच्या मध्यप्रदेश येथील एकाला हडपसर पोलिसांच्या पथकाने दिल्ली येथे जाऊन बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने संशयातून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
असे जरी असले तरी पोलिसांनी केलेल्या तपासात खून झालेल्या व्यक्तीवर चुकीच्या पध्दतीने संशय घेतल्याचेही समोर आले आहे. अरुण किसन सूर्यवंशी (मांजरी, पुणे, मु. रा. कर्नाटक) असे खून झालेल्याचे नाव आहे. पीताराम केवट (वय 23, रा. मांजरी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण सूर्यवंशी (वय 25) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.