24 TMC water release Ujani dam
वेल्हे: पुणे शहरासह जिल्ह्याला पिण्याचे व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसाने धरणसाखळी 100 टक्के भरली आहे. धरणातून मुठा नदीपात्रत 18 जूनपासून विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रातून आतापर्यंत 23.75 टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात आले. याचबरोबर शेतीसाठी मुठा कालव्यातून 3 टीएमसी पाणी सोडण्यात आले.
धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 2 हजार 562 क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पाण्याची आवक कमी झाल्यास मुठा नदीचा विसर्ग कमी करण्यात येणार आहे. (Latest Pune News)
खडकवासला धरण विभागाच्या शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर - फुटाणे म्हणाल्या, सोमवारी (दि. 8) धरण क्षेत्रात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे ओढे- नाल्यांतून पाण्याची मंदगतीने आवक सुरू आहे. त्यामुळे चारही धरणांतून जादा पाणी सोडले जात आहे.
रविवारी (दि. 7) सकाळी सहा ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या 24 तासांत टेमघर येथे 14, पानशेत येथे 18, वरसगाव येथे 16 व खडकवासला येथे 4 मिलिमीटर पाऊस पडला.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
सोमवारअखेर पाणीसाठा
29.15 टीएमसी (99.83 टक्के)