Mula Mutha River Pudhari
पुणे

Mula Mutha River Rejuvenation: मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा होणार विस्तार; मांजरी बुद्रुकपर्यंत कामाला मंजुरी

प्रदूषण नियंत्रण, नदीकाठ विकासासाठी महापालिकेचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करणे, पूरस्थितीवर नियंत्रण मिळविणे आणि नदीकाठाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सुरू असलेल्या ‌‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा‌’चा विस्तार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

नदीसुधार प्रकल्प मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंत वाढविण्याची मागणी भाजपचे नगरसेवक दादा कोद्रे यांनी केली होती. या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

सध्या मुळा नदी पुनरुज्जीवनाचे काम संगम ते बंडगार्डन या 3.70 किलोमीटर आणि बंडगार्डन ते मुंढवा पूल या 5.30 किलोमीटर अशा दोन टप्प्यांत सुरू आहे. या प्रकल्पामुळे नदीकाठाचे सुशोभीकरण, सांडपाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणीय सुधारणा साधण्यास मदत होत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंढवा पुलानंतरचा मुंढवा ते मांजरी बुद्रुक परिसर वेगाने विकसित होत असून, या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. परिणामी नदीपात्रातील प्रदूषण वाढणे, जलपर्णीची समस्या गंभीर होणे आणि पावसाळ्यात पूरधोक्याची शक्यता वाढणे अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे या भागातही नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT