पुणे: मुळा-मुठा या नद्यांमधील विद्राव्य ऑक्सिजन कमी झाला असून, त्याबाबत काय उपाययोजना कराव्यात, याचा अहवाल खडकवासला येथील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राने (सीडब्ल्यूपीआरएस) दिला आहे.
पुण्यातील मुळा-मुठा नद्यांसंबंधीचे अनेक अहवाल आहेत. ज्यात पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन पाण्याची गुणवत्ता विश्लेषण आणि नदीकाठ विकास यांचा समावेश आहे, यात नुकताच एक अहवाल केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राचे (सीडब्ल्यूपीआरएस) तांत्रिक योगदान आहे. या अहवालात उच्च सेंद्रिय प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची आवश्यकता आणि शहरी विकास धोरणांवर प्रकाश टाकला आहे. मुळा-मुठा नद्यांसाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन पर्यावरणीय प्रभावावरील एक मसुदा अहवाल, ज्यात सीडब्ल्यूपीआरएसच्या तांत्रिक योगदानाचा समावेश आहे.
काय आहे अहवालात..?
मुळा-मुठा नदीतील सेंद्रिय प्रदूषण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.
नदी पुनरुज्जीवन विभाग नद्या आणि जलाशयांवर भर देऊन व्यापक पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यात आला आहे.
जलाशयांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या मॉडेलिंगसाठी अत्याधुनिक गणितीय मॉडेल्सचा वापर करून तज्ज्ञांनी हा अहवाल सादर केला आहे.
यात रसायनशास्त्र, पर्यावरण अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी आणि वनस्पतिशास्त्रात प्रवीण शास्त्रज्ञाची निरीक्षणे आहेत.
यात पानशेत, खडकवासला, उजनी, भद्रा, काली, तुंगभद्रा, गोदावरी, कोयना, कुकडी, आंबी, मुठा, भीमा या ठिकाणच्या पाण्याच्या गुणवत्तेचाही अहवालात समावेश आहे.