वाल्मीक कराड याला ‘मोका’ का नाही: खा. सुप्रिया सुळे pudhari Photo
पुणे

वाल्मीक कराड याला ‘मोका’ का नाही: खा. सुप्रिया सुळे

'पारदर्शक चौकशी व्हावी, ही आमची मागणी आहे'

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बीडमधील प्रकरणात सातजणांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, वाल्मीक कराड याला ‘मोका’ का लावला नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.शनिवारी बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, बीड प्रकरणात आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंकी, खा. बजरंग सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

या सगळ्यांची मागणी आहे की, खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो अद्याप दाखल झालेला नाही. अजून एक आरोपी मोकाट फिरतो आहे, त्याला अटक का होत नाही? बीड, परभणीच्या प्रकरणात राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने तपास झाला पाहिजे. पारदर्शक चौकशी व्हावी, ही आमची मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT