पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या विविध भागांतील जिल्ह्यामध्ये महावितरणच्या एक लाखाहून अधिक ग्राहकांनी रूफटॉप सोलर प्रकल्प ( छतावरील सौरऊर्जा प्रकल्प ) बसविले असून, सध्या त्यांची एकत्रित वीज उत्पादन क्षमता 2 हजार मेगावॉटच्या पुढे गेली आहे. दरम्यान या प्रकल्पामध्ये सबसिडी मिळत असल्यामुळे हा प्रकल्प उभारण्यासाठी दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढतच जाणार आहे.
भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे, त्यामुळे सौरऊर्जेपासून वीज उत्पादन करण्यास खूप मोठ्या प्रमाणावर वाव आहे, ही बाब लक्षात घेऊनच केंद्राच्या आणि राज्याच्या उर्जा मंत्रालयाने नागरिकांना तसेच विविध कंपन्यांना सौरऊर्जेवर आधारित रूफटॉफ प्रकल्प उभारण्यास आर्थिक साहाय्य देण्यास सुरुवात केली आहे.
वीज ग्राहकांनी रूफटॉप सोलर यंत्रणा बसविल्यास सौरऊर्जेद्वारे वीज निर्माण होऊन ग्राहकाचे वीजबिल कमी होते. कधीकधी शून्य वीजबिलही येते. ग्राहकाच्या वीजवापरापेक्षा अधिक वीज निर्माण झाली, तर ती महावितरणला विकली जाते व त्याचे पैसे ग्राहकाच्या वीजबिलात कपातीच्या स्वरूपात मिळतात. सर्वसाधारणपणे घरगुती ग्राहक तीन किलोवॉट क्षमतेचे रूफटॉप सोलर प्रकल्प बसवू शकतात, त्यांना केंद्र सरकारकडून 43 हजार रुपये सबसिडी मिळते. चार किलोवॉटला 51 हजार रुपये, तर दहा किलोवॉटला 94 हजार रुपये अनुदान मिळते. गृहनिर्माण संस्थांनी रूफटॉप सोलर यंत्रणा बसविल्यास त्यांनाही अनुदान मिळते व त्यांचा लिफ्ट, पाण्याचा पंप इत्यादींसाठीचा विजेचा खर्च कमी होतो.
वीज ग्राहकांनी रूफटॉप सोलर यंत्रणा बसविल्यास सौर ऊर्जेद्वारे वीज निर्माण होऊन ग्राहकाचे वीजबिल कमी होते. कधीकधी शून्य वीजबिलही येते. ग्राहकाच्या वीजवापरापेक्षा अधिक वीज निर्माण झाली तर ती महावितरणला विकली जाते व त्याचे पैसे ग्राहकाच्या वीजबिलात कपातीच्या स्वरूपात मिळतात. राज्यात 'रूफटॉप सोलर' यंत्रणा बसविणार्या ग्राहकांना आतापर्यंत 73 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
हेही वाचा: