पुणे

राज्यातून मान्सून 2 दिवसांत परतणार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृतसेवा : राज्यात पहिल्या टप्प्यातच 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा जाणवू लागला आहे. बुधवारी पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. दरम्यान, 6 ऑक्टोबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहून कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिम राजस्थानपासून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. सध्या मान्सून जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात भागातून परतीचा प्रवास करीत आहे. दोन दिवसांत महाराष्ट्रातून मान्सून परतणार आहे. मात्र, बंगालच्या उपसागरापासून झारखंडपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT