पुणे : मान्सून गोव्यापर्यंत आला असून, वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत शनिवारी पहाटे तो तळकोकणात आलेला असेल. मान्सून राज्याच्या सीमेवर आल्याने वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे ६ ते ९ जूनदरम्यान राज्यातील ९० टक्के भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. ५) राज्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. ब्रह्मपुरीचे तापमान ४४ अंशांवर गेले होते.
राज्यात ढगाळ वातावरण असल्याने शुक्रवारी प्रचंड उकाडा जाणवत होता. विदर्भाचा पारा ४२ ते ४४, तर उर्वरित राज्यात ३६ ते ४० अंशांवर तापमान असले, तरी ढगाळ वातावरणामुळे नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झालेले दिसले. मात्र, या उकाड्यातून लवकरच सुटका होणार आहे. मान्सून राज्यात दाखल होताच पावसाला सुरुवात होऊन आगामी ४८ तासांत उकाडा कमी होण्याचे संकेत मान्सूनने दिले.
पालघर, ठाणे, मुंबई (६), रायगड,सिंधुदुर्ग ( ६ ते ९), नाशिक (६०), अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा (६ ते ९), कोल्हापूर, सातारा, सातारा घाट (६ ते ९ ), सोलापूर (७,८), छ. संभाजीनगर (७), बीड (६ ते ८), लातूर, धाराशिव (७ ते ९), अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम (६ ते ९)