पुणे

Monsoon Red Alert : सावधान! शुक्रवारपासून सलग 3 दिवस घाटमाथ्याला रेड अलर्ट

Maharashtra Heavy Rainfall Warning : 14 जिल्ह्यांना ऑरेंज, उर्वरित भागाला यलो अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्याला पुढील तीन दिवसांत म्हणजे, शुक्रवार (दि.3) ते रविवार (दि. 5 जुलै) पर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, पुणे-सातारा घाटमाथा या भागांत रेड अलर्ट (अतिवृष्टी)चा इशारा दिला आहे, तर 14 जिल्ह्यांना मुसळधारेचा ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.

गत 24 तासांत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीची नोंद झाली, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पावसाची नोंद झाली. राज्याच्या बहुतांश भागात हलका, पण संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, शुक्रवार (दि.3) ते रविवार (दि.5 जुलै) दरम्यान ठाणे, रायगड जिल्ह्यासह पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्याला रेड अलर्ट दिला आहे.

...असे आहेत अलर्ट (दि. 3 ते 6 जुलै)

- रेड अलर्ट (अतिवृष्टी ः 200 मि. मी.)ः ठाणे (4), रायगड (3, 4), पुणे घाटमाथा (3, 4, 5), सातारा घाटमाथा (4)

ऑरेंज अलर्ट ः (मुसळधार 59 ते 100 मि. मी.)ः पालघर (3 ते 5), ठाणे (3 ते 5), मुंबई (3 ते 5), रायगड (5, 6), रत्नागिरी (3 ते 6), सिंधुदुर्ग (4), नंदुरबार (4), नाशिक घाट (4, 5), कोल्हापूर घाट (3 ते 5), सातारा घाट (3,5,6), अकोला, अमरावती, बुलडाणा (3).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT