पुणे

Mansoon Update : आनंदवार्ता! पुण्यात मान्सून दाखल, शहरासह घाटमाथ्याला २७ पर्यंत यलो अलर्ट

Mansoon Yellow Alert Issued : गत १५ वर्षात फक्त चार वेळा मान्सून शहरात १५ जून नंतर आला आहे.शहरासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर २७ जून पर्यंत राहणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्याच्या सीमेवर अडखळलेला मान्सून अखेर सोमवारी दि. २१ जून रोजी पुणे शहरात दाखल झाला.दरवर्षीच्या तुलनेत १० ते १२ दिवस उशीरा आला तरी आता संपूर्ण जिल्ह्यात तो वेगाने जाणार आहे. गत १५ वर्षात फक्त चार वेळा मान्सून शहरात १५ जून नंतर आला आहे.शहरासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर २७ जून पर्यंत राहणार आहे.

शहरात दरवर्षी १० ते १२ जून दरम्यान मान्सून शहरात दाखल होतो.मात्र यंदा तो २१ जून रोजी आला.मागच्या वर्षी तो २६ मे रोजी आला होता,गत ६३ वर्षातील ते सर्वात लवकर आगमन ठरले.मात्र यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे मान्सून अडखळला होता.शहरातील मान्सून आगमानाचा पॅटर्न पाहिला तर गत १५ वर्षात ( सन २०११ ते २०२६) केवळ ४ वेळा तो नियोजित तारखेपेक्षा उशीरा आला आहे.

रविवारी २० जून रोजी मान्सून सक्रीय होताच शहरात मुसळधार पावसाची नोंद झाली.एनडीए भागात ७८.५ तर खडकवासला ६० आणि शिवाजीनगर भागात १८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली.त्यामुळे हवामान विभागाने सोमवारी सकाळी शहरात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली.

शहरातील मान्सूनची वैशिष्टे

  • जूनच्या १९ दिवसात पुण्यात शुन्य मी.मी. पाऊस होता.

  • गेल्या अनेक वर्षात अशी स्थिती प्रथमच

  • सन २०२२ मध्येही ३० दिवसांत केवळ २६ मी.मी ची नोंद

  • २०२५ च्या जून मध्ये झाला होता २७४ मी.मी पाऊस

  • शहराची जूनची सरासरी : ११६.१ मी.मी

  • २०२५ मध्ये २६ मे रोजी आला होता.गत ६३ वर्षातील हे सर्वात लवकर आगमन ठरले होते.

का उशीर झाला?

  • अरबी समुद्रातील वारे कमकुवत होते.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नव्हते

  • त्यामुळे मान्सून जिल्ह्याच्या सीमेवर दोन आठवडे थबकला होता.

जिल्ह्यात कुठे सक्रीय...

पुणे शहर, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, हवेली, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरुर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर

कुठे जोर...

मावळ,मुळशी,भोर,वेल्हे

कुठे कमकुवत...

बारामती, इंदापूर, दौंड

शहरातील गत पाच वर्षातील मान्सूनचे आगमन (वर्ष आणि आगमनाची तारीख)

  • २०१९ : २४ जून (उशीरा)

  • २०२२ : ११ जून (वेळेत)

  • २०२३ : २४ जून (उशीरा)

  • २०२५ : २६ मे (विक्रमी वेळेत)

  • २०२६ : २१ जून (उशीरा)

२७ पर्यंत शहर आणि घाट माथ्याला यलो अलर्ट..

शहरावर काळे अन पांढरे शुभ्र असे दोन्ही प्रकारचे ढग दाटून आले आहेत.घाटमाथ्यासह शहराला २७ जून पर्यंत मुसळधारेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT