Monsoon Update  (File Photo)
पुणे

Monsoon Update: अरबी समुद्रात मान्सूनची प्रगती; 26 मे रोजी केरळात येणार

केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मान्सूनची अरबी समुद्रात जोरदार प्रगती सुरू असून, तो श्रीलंकेत मुक्कामी आहे. केरळात 26 मे रोजी मान्सून येणार असल्याने महाराष्ट्रापर्यंत ढग आणि वारे येत आहेत. वाऱ्यांचा वेग वाढल्याने शुक्रवारी काही भागांत जोरदार मान्सूनपूर्व सरी बरसल्या.

पुण्यातील चिंचवड भागात 60 मि. मी. पावसाची नोंद झाली. विदर्भात मात्र उन्हाचा तडाखा कायम असून, ब्रह्मपुरी येथे 47.2 अंश तापमानाची नोंद झाली.

मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली. धाराशिव येथे जोरदार सरी बरसल्या तेथे 10 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, मान्सूनने अरबी समुद्रात प्रगती केली असून, तो केरळच्या दिशेने निघाला आहे. केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT