Monsoon update | आनंदवार्ता! मान्सून 48 तासांत अंदमानात File Photo
पुणे

Monsoon update | आनंदवार्ता! मान्सून 48 तासांत अंदमानात

राज्यात पाच दिवस उष्णतेची लाट; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे : मान्सूनची प्रगती वेगाने सुरू असून, अवघ्या 48 तासांत तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, मान्सूनला अनुकूल गती मिळण्याची स्थिती तयार झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आगामी पाच दिवस उष्णतेची लाट सक्रिय राहणार असली, तरी कोकण, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्याला हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

16 मेच्या सुमारास, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान व निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. नैऋत्य आणि त्याला लागून असलेल्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील सुस्पष्ट कमी दाबाचे क्षेत्र 14 मे रोजी सकाळी 8.30 वाजता त्याच भागात कायम आहे; तसेच चक्रीय वार्‍यांची स्थिती समुद्रसपाटीपासून 5.8 कि.मी. उंचीपर्यंत विस्तारलेली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

* कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला 15 व 16 मे रोजी पावसाचा इशारा

* मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (वेग 40 ते 50 कि.मी./प्रतितास)

* महाराष्ट्रामध्ये 16 मेपर्यंत कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी टप्प्याटप्प्याने वाढ शक्य

* 16 मेपर्यंत उष्णतेची लाट, दमट हवामान, रात्रीच्या वेळीही उबदार वातावरण राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT