पुणे : तब्बल 2 हजार 500 कि.मी. रुंदीचे ढग भारताच्या दिशेने निघाले असून, त्यांचा वेग ताशी 70 कि.मी. इतका आहे. त्यामुळे मान्सून केरळम्मध्ये 48 तासांत येऊ शकेल, अशी स्थिती आहे.
मान्सूनचा एक पदर श्रीलंकेत अडखळला असला, तरी दुसरा पदर लक्षद्वीप बेटांपर्यंत आला आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात वार्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने त्याचा वेग ताशी 30 ते 35 वरून ताशी 70 कि.मी.वर गेला आहे. त्यामुळे विदर्भात 29 मे ते 1 जूनदरम्यान अतिमुसळधार, तर उर्वरित राज्यात तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट कमी होणार आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने सुमारे 2 हजार 500 फूट रुंदीचे ढग भारताच्या दिशेने निघाल्याचे उपग्रहाने टिपलेल्या चित्रात दिसून आले आहेत.