पुणे: शहरात यंदा मान्सून जोमात असून, मेमध्येच जूनची सरासरी पार केली आहे. शहरात 31 मेअखेर 257 मि.मी. पाऊस झाला, तर 5 जूनपर्यंत शहरात 17.2 मि.मी. पाऊस झाला. जूनची सरासरी 156 मिलिमीटर इतकी आहे. मात्र, ही सरासरी मेअखेर गाठली आहे. दरम्यान, शहराला 9 जूनपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. (Latest Pune News)
शहरात यंदा 17 ते 26 मे या कालावधीत मुसळधार पाऊस झाला. शहराची मे महिन्याची सरासरी फक्त 14 मि.मी. आहे. मात्र, 31 मेअखेर 267 मि.मी. पाऊस झाला, तर जूनची सरासरी 156 मि.मी.ची आहे. 5 जूनअखेर गणित केले, तर शहरात गत वीस दिवसांत शहरात 274.2 मि.मी. पाऊस झाला आहे. गत अनेक वर्षांतील हा विक्रम आहे.