पुणे

पुणे : पाटील इस्टेट भागातील इराणी टोळीवर मोक्का

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरात दहशत माजविणारा गुंड कासीम ऊर्फ चित्ता बाबरबुर्ज इराणी याच्यासह 21 साथीदारांच्या विरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कासीम इराणी टोळीतील 21 साथीदारांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

कासीम आणि त्याचे साथीदार पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी महम्मद हुसेन इराणी (वय 33), गुलामनबी हुसेन इराणी (वय 30), सनोबर हुसेन इराणी (वय 55), सकिना फिरोज इराणी (वय 50), राणी हुसेन इराणी (वय 25), आमना याकूब इराणी (वय 27), सय्यदनूर जनशा इराणी, रुक्साना सय्यदनूर इराणी (सर्व रा. महात्मा गांधी वसाहत, पाटील इस्टेट, जुना मुंबई-पुणे रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे.

कासीम इराणी आणि साथीदारांनी पाटील इस्टेट परिसरात दहशत माजविण्याचे गुन्हे केले आहेत. इराणी टोळीच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी तयार केला होता. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मान्यता दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी 25 गुंड टोळ्यांच्या विरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.

SCROLL FOR NEXT