खडकवासला: महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला विधानसभा मतदारसंघाने हिंदी भाषासक्तीला विरोध केला आहे. यासंदर्भात विविध शाळांना निवेदन देऊन सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यात आला.
त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली सरकारकडून आडमार्गाने हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या धोरणाचा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात खडकवासला मतदारसंघातील विविध शाळेच्या मुख्याध्यापकांना निवेदन देऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सरकारने हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे. (Latest Pune News)
मनसेचे खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष विजय मते, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष शिवाजी मते, उपविभाग अध्यक्ष गौरव दांगट, चंदन कड, सुनील कोरपडे, अतुल शिळीमकर, नितीन वांजळे, शहर सचिव सोनाली पोकळे, शांता कोकरे, स्वप्निल नांगरे, आकाश साळुंखे, नागेश गायकवाड, बाळासाहेब हनमघर, अंगराज भिसे, राहुल वाळुंजकर, गणेश धुमाळ, रियाज शेख, नीलेश जोरी आदींसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.