पुणे

पुण्यात मनसे पदाधिकार्‍याच्या मोटारीची तोडफोड

अमृता चौगुले

वाघोली(ता. हवेली); पुढारी वृत्तसेवा : वाघोली येथे मनसे पदाधिकार्‍याच्या चारचाकी गाडीची काही जणांनी सिमेंटच्या विटांनी तोडफोड करत नाव घेऊन 'मर्डर' करण्याची धमकी देत दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. नुकत्याच घडलेल्या या प्रकाराबाबत लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस संबंधितांचा शोध घेत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगेश बाळासाहेब सातव हे मनसेचे वाघोली शाखाध्यक्ष म्हणून काम पाहतात. वाघोली येथील काळूबाई नगर मध्ये कुटुंबासह ते राहतात. रविवारी (दि. 2) मध्यरात्री पार्किंगमध्ये काही जण 'मंगेश सातव तुझा मर्डर करायचा' असे जोरजोरात ओरडून धमकी देत होते. सातव यांच्या पार्किंगमध्ये असलेल्या चारचाकी गाडीची फोडतोड करून दहशत माजवत होते. याप्रकरणी सातव यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT