MNS protest against government
कोंढवा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले.
केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना शहरात महिलांवर होणार्या अत्याचारांबाबत निवेदन देऊन जाब विचारण्यासाठी मनसेने आज कोंढवा बुद्रुक येथील इस्कॉन चौकात हे आंदोलन आयोजित केले होते. (Latest Pune News)
परंतु, ते करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले, असे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजेंद्र बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश भोईबार यांनी केले होते.