पुणे

पुणे : आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले महविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा शिंदे आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि युवक क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजक आणि पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी रवींद्र धंगेकर म्हणाले, हा सत्कार म्हणजे माझ्या परिवाराने केला आहे आणि मी भारावून गेलो आहे. शिंदे आळी मंडळ व युवक क्रीडा मंडळ यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे आणि ते यापुढेही असेच रहावे. या प्रसंगी काँग्रेसचे संजय बालगुडे, राष्ट्रवादी काँगेसच्या रूपाली पाटील, पुणे अर्बन बँकेचे अध्यक्ष नीलेश अण्णा ढमढेरे, काँग्रेसच्या नीता राजपूत, सामाजिक कार्यकर्ते नंदाभाऊ शेडगे आणि शिंदे आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे, युवक क्रीडा मंडळाचे सभासद उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT