पुणे

पुणे : पोलिस अधीक्षकांच्या शिक्क्यांचा सीसीटीव्ही फुटेजसाठी गैरवापर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने खोट्या सह्या करून त्यांच्या शिक्क्यांचा वापर करून कार्यालयीन शिपायाने बनावट पत्र तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने पत्र तयार करून ते दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात देत तेथील सीसीटीव्ही फुटेज मागविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस लोहमार्ग उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार लोहमार्ग पोलिस मुख्यालयातील कार्यालयीन पोलिस कर्मचारी एस. सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 7 नोव्हेबर 2022 घडला आहे. एस सोनवणे हा लोहमार्ग पोलिस दलात आहे.

पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या कार्यालयात त्याची नेमणूक आहे. त्याने तक्रारदार यांच्या परवानगीशिवाय कार्यालयात प्रवेश करून कुलूप उघडले. चंद्रकांत भोसले व पोलिस अधीक्षक लोहमार्ग, पुणे या नावाचा गोल शिक्का तसेच त्यांच्या खोट्या सहीचा वापर करुन स्वत:च्या फायद्यासाठी बनावट पत्र तयार केले. ते खरे असल्याचे भासवून ते दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांना पाठविले. त्याना हॉस्पिटलकडील सीसीटीव्ही फुटेज मागितले. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वालकोळी करत आहेत.

फुटेज मागवण्याचे कारण गुलदस्त्यातच!
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सोनवणे यांनी हा प्रताप का केला? त्यांना सीसीटिव्ही फुटेज कशासाठी हवे होते, येवढा अट्टाहास करण्यामागाचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांना तपासासाठी ताब्यात घेतल्यानंतरच चौकशीत हा प्रकार समोर आला आहे, असे खडकी पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT