file photo
पुणे

अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरण : पीडितेसह आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण

पुढारी वृत्तसेवा

शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारातच एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याप्रकरणात पीडितेसह आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.

ओम आदेश घोलप (वय 20) व स्वप्निल विलास देवकर (वय 22) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयात युक्तिवाद करताना सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नितीन कोंघे म्हणाले, घोलप व देवकर यांनी पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडीओ इतरत्र शेअर केले आहे का ? याची खात्री करायची आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त करण्यात आले असून, त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.

आत्तापर्यंतचा तपास

पीडितेने दाखविलेल्या घटनास्थळांचा पंचनामा झाला आहे. घटनास्थळ व परिसरातील डीव्हीआर जप्त करण्यात आले आहेत. पीडितेच्या मैत्रिणीसह महाविद्यालयाचे ट्रस्टी, प्राचार्य, समुपदेशक यांचे जबाब घेण्यात आले असून, पीडितेचा बी.एन.एस.एस. 193 (1) नुसार जबाबासाठी न्यायालयात रिपोर्ट सादर केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच आरोपी व अल्पवयीन बालकांची ससून रुग्णालयात लैंगिक सक्षमतेची चाचणी करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT