पुणे

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील कोंडीवर उपाययोजना

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका, मेट्रो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि वाहतूक पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. याबाबत पोलिस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी लोखंडी कठडे उभे (बॅरिकेडिंग) करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठ चौकाकडून शिवाजीनगरकडे जाणार्‍या वाहनांसाठी मार्गिकाही (लेन) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी वाहतूक बदल केले जाणार आहेत. यामुळे नागरिकांनी इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे आचार्य आनंदऋषीजी चौकात (पुणे विद्यापीठ चौक) कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी संयुक्त पाहणी करण्यात आली. त्यानंतर याबाबत पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. विद्यापीठ चौकाकडून शिवाजीनगरकडे तसेच शिवाजीनगरकडून विद्यापीठ चौकाकडे जाणार्‍या वाहनांसाठी मार्गिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

मेट्रोच्या पुढील टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार असून, विद्यापीठ चौकातील 11 मीटरपर्यंतचा रस्ता या कामासाठी वापरला जाणार आहे. त्यासाठी मेट्रोकडून अतिरिक्त बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता तसेच अन्य रस्त्यांवरील वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. बाणेर रस्ता, औंध रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे येणारी वाहने विनासिग्नलशिवाय शिवाजीनगरकडे डाव्या मार्गिकेकडे नेण्यात येणार आहेत. विद्यापीठ चौकात पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी यापूर्वी कॉसमॉस बँकेजवळ 'यू टर्न'ची सोय होती.

तेथील 'यू टर्न' बंद करून सेनापती बापट रस्ता चौकातून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे. सेनापती बापट रस्त्याकडून (चतु:शृंगी मंदिर) विद्यापीठ चौकाकडे येणारी सर्व वाहने सेनापती बापट रस्ता चौकातून डावीकडे वळून सरळ पाषाण रस्त्याकडे वळविण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी मेट्रोकडून सेनापती बापट रस्ता चौक, पाषाण रस्ता असे बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे.
पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता चौक, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता चौकातून उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जाता येईल.

गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्त्यावरून औंधकडे जाण्यासाठी पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता चौकातून उजवीकडे वळून सर्जा हॉटेल चौकातून आयटीआय रस्त्याने परिहार चौकाकडून इच्छितस्थळी जाता येईल. पिंपरी-चिंचवडकडून येणार्‍या वाहनांनी गणेशखिंड रस्त्याचा वापर न करता ब—ेमेन चौकातून डावीकडे वळून स्पायसर कॉलेज रस्ता, आंबेडकर चौक, साई चौक, खडकी रेल्वे स्थानक भुयारी मार्ग, डावीकडे वळून चर्च चौक, जुना मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले आहे. पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, मुंढवा परिसरातून औंधकडे जाणार्‍या वाहनांनी अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, जुना मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करून खडकी रेल्वेस्थानक भुयारी मार्ग, आंबेडकर चौक, स्पायसर कॉलेज रस्ता, ब—ेमेन चौकातून औंधकडे जावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT