वनराज आंदेकरांच्या खुनासाठी बोपदेव घाटात बैठका अन् प्लॅनिंग; 3 वेळा फसला प्लॅन file photo
पुणे

वनराज आंदेकरांच्या खुनासाठी बोपदेव घाटात बैठका अन् प्लॅनिंग; 3 वेळा फसला प्लॅन

21 आरोपींवर 3400 पानांचे आरोपपत्र

पुढारी वृत्तसेवा

पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निघृण खून करण्यासाठी आंबेगाव पठार व बोपदेव घाटात आरोपींच्या बैठका होऊन प्लॅनिंग झाले होते. आरोपींनी यापूर्वी तीन ठिकाणी वनराज यांचा खून करण्यासाठी ट्रॅप लावला होता, मात्र तो ट्रॅप फसला होता.

चौथ्यावेळी त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. या खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 21 आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अन्वये 3 हजार 400 पानांचे दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे.

दोषारोपपत्रात टोळी प्रमुख हा सोमनाथ गायकवाड असल्याचेही म्हंटले आहे. सोमनाथ गायकवाड, संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर, प्रकाश कोमकर, आकाश म्हस्के, विवेक कदम, तुषार कदम, व समीर काळे यांच्यासह 21 जणांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे. तसेच, यात दोन अल्पवयीन मुलांचा देखी समावेश आहे.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची 1 ऑक्टोंबर 2024 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वारकरून निर्घुन हत्या करण्यात आली होती. या खूनाने शहरात मोठी खळबळ माजली होती. यात वनराज यांची बहिण आणि भाऊजी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान, आंदेकर यांसोबत वनराज यांची बहिण संजिवनी कोमकर व तिच्या कुटूंबियांचे प्रॉपर्टीवरून वाद होते. त्यातच नाना पेठेत संजिवनी कोमकर यांच्या दुकानावर पालिकेने अतिक्रमण कारवाई केली होती.

ही कारवाई वनराज यांनी करण्यास लावली, असा समज कोमकर कुटूंबाचा होता. त्याचा राग त्यांच्यात मनात होता. घटनेच्या दोन दिवसांपुर्वी यावरून त्यांच्यात वादविवाद झाले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात दुसरे महत्वाचे कारण सोमनाथ गायकवाड याच्या टोळीतील सदस्य निखील आखाडे याचा खून कृष्णा आंदेकर व त्याच्या साथीदारांनी केला होता. त्यावरून आरोपींनी एकत्रित येऊन कट रचून वनराज आंदेकर यांच्या खूनाचे प्लॅनिंग केले.

खूनानंतर पोलिसांनी वाई परिसरातून आरोपींना पकडले होते. त्यांच्याकडून 8 पिस्तूल, 13 जिवंत काडतूसे, 7 कोयते, 7 दुचाकी 3 कार जप्त केल्या होत्या. पोलिसांनी गुन्याचा तपासकरून एकूण 21 आरोपींना याप्रकरणात अटक केली. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तसेच, 39 साक्षीदार देखील तपासले आहेत.

त्यानूसार पोलिसांनी तपासपुर्णकरून मोक्कानुसार 3400 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेखेच्या अधिकारी आणि अमंलदारांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल केले.

आरोपींनी एकत्र येऊन पवळे चौक कुंभार बावडी येथील ऑफीस जवळ, 2023 च्या नवरात्र उत्सवाच्या गवळीवाडा कॅम्प येथे वनराज हे येणार असल्याचे समजल्यावर ट्रॅप लावला होता. दि. 31 डिसेंबर 2023 रोजी महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृह येथे लग्न कार्यासाठी वनराज आंदेकर येणार असल्याचे समजल्यावर हा कोयते घेऊन आरोपी ट्रॅप लावून थांबले होते. मात्र गर्दीमुळे त्यांना वनराज यांना मारता आले नाही.

कोयत्याने मारणे शक्य होत नसल्याने पिस्तुले आणली

कोयत्याने वनराज आंदेकर यांचा मर्डर करणे शक्य नसल्याने तुषार कदम, आकाश म्हस्क,े अनिकेत दुधभाते, सगार पवार यांनी सर्व मिळून 1 लाख 60 हजार जमा केले होते. तर साहिल दळवी याने मोहोळ येथून आठ धारदार कोयते विकत आणले होते. तर अभिषेक खोंड व संगम वाघमारे यांनी मध्यप्रदेशाच्या बॉर्डरवरून 8 पिस्तुले, 21 जिवंत काडतुसे विकत आणी होती.

नारायणपूर येथील माळराणावर गोळीबाराचा सराव

मध्यप्रदेशातून पिस्तुल विकत आणल्यानंतर समीर काळे यांनी वनराज यांचा गेम करण्यासाठी नारायणपूर जवळील माळराणावर फायरींगचा सराव केला होता. त्यानंतर आरोपींनी पुर्ण प्लॅनिंग करून वनराज यांचा खून केला होता.

दोषारोपपत्रातील महत्वाचे मुद्दे

  • घटनास्थळ, आंबेगाव पठार, दापोली येथील सीसीटीव्ही फुटेज

  • आरोपींच्या आवाजाचे नमुने

  • आरोपींची ओळख परेड

  • आरोपींनी मोबाईलद्वारे केलेले संभाषण व तांत्रिक विश्लेषण

  • आरोपींचे जुने गुन्हेगारी रेकॉर्ड

  • प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे केलेला तपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT