पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्यासाठी. स्वच्छ भारत अभियान पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबविण्यात येत आहे. यासाठी नियुक्त ब्रॅन्ड अॅम्बेसिडरची बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वच्छ भारत अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये स्थानिक नागरिकांमधून पिंपरी चिंचवड शहराचे नाव देशपातळीवर नेले आहे. अशा नागरिकांमधुन कलाकार, डॉक्टर, खेळाडु, शिक्षक व विशेषत: अपंग व ट्रान्सजेन्डर यांची ब्रॅन्ड अॅम्बेसिडर म्हणुन नियुक्ती केली आहे.
स्वच्छतेची महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून क्रीडा क्षेत्रातील पूजा शेलार, ज्येष्ठ कलाकार सुरेश डोळस, तृतीयपंथीय शिवान्या पंकजा बोकील, अपंग संवर्गातुन संगिता जोशी- काळभोर व मुख्याध्यापक मनोज देवळेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. उपआयुक्त अजय चारठाणकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ भारत अभियान समन्वयक विनोद जळक, सर्व ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, उपस्थित होते. या वेळी स्वच्छ सर्वेक्षण कार्यपध्दतीची माहिती चारठाणकर यांनी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर यांना दिली.