पुणे

पुणे : एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलच्या माध्यमातून एमबीए, एमएमएस प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 13 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल. या अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी 15 ऑक्टोबर रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी 19 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील सरकारी, अनुदानित, विद्यापीठांतर्गत व्यवस्थापन संस्था, विद्यापीठांतर्गत व्यवस्थापन विभाग, विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांमधील व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (एमबीए/एमएमएस) तसेच पीजीडीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संबंधित प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) तीन फेर्‍या होतील. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी 19 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, याच दिवशी पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल.

प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली फेरी 19 ते 31 ऑक्टोबरदरम्यान, दुसरी फेरी 1 ते 9 नोव्हेंबर आणि तिसरी फेरी 10 ते 17 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केली आहे. सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासक्रमाचे वर्ग 10 नोव्हेंबरपासून सुरू होतील. तसेच, संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांना प्रवेशाची माहिती अपलोड करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

या तारखा ठेवा लक्षात…
ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत : 13 ऑक्टोबरपर्यंत
कागदपत्रांची पडताळणी आणि कन्फर्मेशन : 13 ऑक्टोबरपर्यंत
प्राथमिक गुणवत्ता यादी : 15 ऑक्टोबर
गुणवत्ता यादीवरील आक्षेप : 16 आणि 18 ऑक्टोबर
अंतिम गुणवत्ता यादी : 19 ऑक्टोबर

पहिली फेरी
रिक्त जागा जाहीर :
19 ऑक्टोबर
पसंतीक्रम भरण्याची मुदत :
20 ते 25 ऑक्टोबर
कॅप राउंड 1 अ‍ॅलॉटमेंट :
28 ऑक्टोबर
महाविद्यालयात जाऊन
प्रवेश निश्चित करणे :
29 ते 31 ऑक्टोबर

दुसरी फेरी
दुसर्‍या फेरीसाठी रिक्त
जागा प्रसिद्ध : 1 नोव्हेंबर
पसंतीक्रम भरण्याची
मुदत : 2 ते 4 नोव्हेंबर
कॅप राउंड दोन अ‍ॅलॉटमेंट
प्रसिद्ध : 6 नोव्हेंबर
महाविद्यालयात
जाऊन प्रवेश निश्चित
करणे : 7 ते 9 नोव्हेंबर

अशी असेल तिसरी फेरी
तिसर्‍या कॅप राउंडसाठी रिक्त जागा प्रसिद्ध : 10 नोव्हेंबर
पसंतीक्रम भरण्याची मुदत : 11 ते 13 नोव्हेंबर
कॅप राउंड 3 अ‍ॅलॉटमेंट प्रसिद्ध होण्याचा दिनांक : 14 नोव्हेंबर
महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे : 15 ते 17 नोव्हेंबर
शैक्षणिक वर्ष सुरु – 10 नोव्हेंबर प्रवेश कटऑफ – 23 नोव्हेंबर

SCROLL FOR NEXT