Vaishnavi Hagawane Case
पुणे: ‘हगवणे कुटुंबीयांकडून माझाही छळ करण्यात आला होता. याप्रकरणी मी महिला आयोगाकडे तक्रार केली होती,’ असा दावा हगवणे कुटुंबीयांची थोरली सून मयूरी जगताप यांनी केला.
या प्रकरणात महिला आयोगाने काही पावले उचलली नाहीत. यामागे राजकीय दबाव असू शकतो. याखेरीज पोलिसांवर राजकीय दबाव असू शकतो. माझी एफआयआर नोंदवून घेताना ज्या पोलिस अधिकारी माझ्याशी चांगले बोलत होत्या, त्या दुसर्या दिवशी माझ्याशी अरेरावीची भाषा बोलत होत्या, असाही धक्कादायक खुलासा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. (Latest Pune News)
दरम्यान, मयूरी जगताप यांनी छळाची तक्रार पोलिसातील महिला कक्षाकडे केली होती. ही तक्रार महिला आयोगाकडे देण्यात आली नव्हती, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. वैष्णवी हगवणे ह्या विवाहितेने हुंड्यासाठी होणार्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची दिनांक 19 मे 2025 रोजी स्वाधिकारे दखल घेतली आहे., असे चाकणकर यांनी सांगितले.