पुणे

मुलाला सोडून सांगवीतील विवाहिता बेपत्ता; सांगवी येथील प्रकार

अमृता चौगुले

सांगवी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सांगवी येथे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी परप्रांतीय विवाहिता अडीच वर्षांच्या मुलाला सोडून बेपत्ता झाली आहे. या घटनेने गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेची नोंद माळेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमरी बलिराम चतुर्वेदी (वय 28, सध्या रा. श्रीरामनगर सांगवी; मूळ रा. पेंड्री तालाब एन, ता. मुंगेली, जि. लारमी, राज्य छत्तीसगड) ही विवाहित महिला रविवारी (दि. 20) सकाळी दहाच्या सुमारास कोठेतरी निघून गेल्याची फिर्याद तिचा पती बलिराम मिलापदास चतुर्वेदी (वय 31) याने दिली. तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय मोहिते करीत आहेत.

घटनास्थळावरून बेपत्ता विवाहितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, तो मुलाला बाहेर घेऊन गेला होता. माघारी घरी परत आल्यावर पत्नी राजकुमरी घरात दिसली नाही. तिचा आजूबाजूला शोध घेतला असता ती आढळून आली नसल्याने त्याने माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घराजवळच्या एका युवकाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून घेऊन गेला असल्याचा संशय बलिराम चतुर्वेदी याने व्यक्त केला. दरम्यान, आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला सोडून विवाहिता बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

SCROLL FOR NEXT