पुणे

धक्कादायक ! लग्नात हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

लग्नात हुंडा दिला न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी पती, सासू आणि सासरे या तिघांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण पवार (वय 33), सासू (वय 55) आणि सासरे बाळासाहेब पवार (60, सर्व रा. कसबा पेठ, ता. फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी पीडित विवाहितेने गुरुवारी (दि. 26) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 27 जानेवारी 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये फलटण आणि चिंचवडगाव येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लग्न झाल्यापासून आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांचा किरकोळ वेगवेगळ्या कारणावरून त्रास देत छळ केला.

तूच भांडखोर आहेस म्हणून तुझ्या पहिल्या नवर्‍याने तुला सोडले असेल, तुझ्या आई-वडिलांनी फसवून लग्न लावले, लग्नात हुंडा दिला नाही, आमचा कोणताही मानपान केला नाही, असे टोचून बोलत वेळोवेळी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. फिर्यादी यांच्या पतीने त्यांचे फिर्यादी यांचे एटीएम कार्ड स्वतःजवळ ठेवून घेतले आणि त्यातून एक लाख रुपये स्वतःच्या वापरासाठी काढले. नंतर फिर्यादी यांच्या आई-वडिलांनी लग्नात दिलेले दागिने नवर्‍याने परस्पर गहाण ठेवले. या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक झडते
करीत आहेत.

SCROLL FOR NEXT