पुणे

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आज ‘जेजुरी’ दौऱ्यावर

Laxman Dhenge

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील गुरुवारी (दि. १६) दुपारी दोन वाजता जेजुरीत येत आहेत. कुलदैवत खंडोबा गडावर दर्शन घेऊन जुनी जेजुरी येथे उपस्थित समाजबांधवांशी ते संवाद साधणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.

मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने जेजुरीत ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले होते, तसेच सासवड येथे समाजाच्या वतीने साखळी आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील जेजुरीत येत आहेत.

कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर जुनी जेजुरी येथे गुरुवारी दुपारी २ वाजता ते समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असताना जरांगे पाटील जेजुरीत येत असल्याने या दौऱ्याकडे शहर आणि तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT