पुणे: मराठा समाजाच्या आंदोलनाला सध्याचे सरकारच जबाबदार आहे. आंदोलन हाताबाहेर गेले नसले तरी, सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर तोडगा काढावा. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलावून 24 तासांत हे सर्व मान्य करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
हिंदूस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. या वेळी प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. (Latest Pune News)
सुळे म्हणाल्या, आंदोलनाला ’रसद’ पुरवणार्यांची माहिती गृहखात्याला असेल, तर त्यांनी तातडीने ती यादी जाहीर करावी. सरकारमध्ये बसून अशा गोष्टी करणे योग्य नाही. जर सरकारलाच या गोष्टी माहित नसतील, तर गृहखाते आणि सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.