जुन्नर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या सतीश ज्ञानोबा देशमुख(वय ४५)रा.वरडगाव,ता.केज,जि. बीड यांना रॅलीदरम्यान अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान,त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. (Latest Pune News)