जुन्नर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधवांच्या मोर्चासह मुंबई ला निघालेले मनोज जरांगे हे गुरुवारी (दि २८) रोजी सकाळी साडे सात च्या दरम्यान जुन्नर येथे पोहचले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ हजारो आंदोलनकर्ते यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवरायांचा जयघोष तसेच एक मराठा लाख मराठा तसेच जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. (Latest Pune News)
बुधवार (दि.२७) रोजी मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबई कडे निघालेले जरांगे यांची ठिकठिकाणी समाजबांधवानी उत्स्फूर्त स्वागत केले. जुन्नर येथे सकाळी पोहचल्या नंतर ते थोड्याच वेळात किल्ले शिवनेरी गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.
दरम्यान किल्ले शिवनेरी येथे पहाटे पासूनच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने येत असून एक मराठा लाख मराठा,लडेंगे जितेंगे हम सब जरांगे आदी घोषणांनी किल्ले शिवनेरी परिसर दणाणून गेला आहे.