Tribal Students Protest Pudhari
पुणे

Manjari Tribal Students Protest: मांजरीतील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे १२ दिवसांपासून बेमुदत उपोषण; मागण्यांसाठी सरकारकडे धाव

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची आंदोलनस्थळी भेट; विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, आदिवासी विकासमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत तासन्‌तास प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

मांजरी: मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी गेल्या १२ दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सोमवारी सकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यार असल्याचे सांगितले.

उपोषणाला बसलेला विद्यार्थी राहुल धनवे यांची प्रकृती आणखी खालावली असून, त्याला वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त आहे. तसेच त्याच्या यकृतावरही परिणाम होण्यास सुरुवात झाल्याचे डॉक्टरांनी सूचित केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ भांडे, सूरज कोकणे, नीलेश सोनवणे, रवींद्र लोटे यांच्यासह अन्य विद्यार्थी आदिवासी विकासमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले. मात्र, सुमारे आठ तास प्रतीक्षा करूनही त्यांची अद्याप भेट झालेली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थी प्रतिनिधींनी केला आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सरकारविरोधात नाराजीचे वातावरण आहे. सरकारने विद्यार्थी प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा करून मागण्य मान्य करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT